तरुण आहे रात्र अजुनी
मुद्दामच हि post मराठीत लिहितोय..त्याला कारणही थोडं तसंच आहे! काल सुरेश भटांची ही कविता वाचण्यात आली. थोडंसं google केल्यावर हे लक्षात आलं कि पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं असं आहे हे गाणे ! त्याचे बोल हे असे आहेत -
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे?
अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला;
अजुन मी विझले कुठे रे? हाय ! तू विझलास का रे?
सांग, ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे... आणि तू मिटलास का रे?
बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे?
उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा
तू किनाऱ्यासारखा पण कोरडा उरलास का रे?
ओठ अजुनी बंद का रे? श्वास ही मधुमंद का रे?
बोल, शेजेच्या फुलांवर तू असा रुसलास का रे?
गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - आशा भोसले
राग - बागेश्री (नादवेध)
आता सुरुवातीला जेव्हा वाचलं आणि ऐकलं तेव्हा वाटलं कि भटांच्या काही इतर गाण्यांप्रमाणेच प्रणयाने उत्कट भरलेलं असं आहे हे गाणे! पण नंतर या गाण्याबद्दलचा एक किस्सा वाचण्यात आला आणि या गाण्याचा पूर्ण अर्थच बदलून गेला. तो किस्सा असा -
आशा भोसले यांनी स्वरबद्ध केलेलं हे स्वर्गिय गीत आज आपल्याला सुखावते, पण पहिल्यांदा त्या हे गाणे गायला तयार नव्हत्या. कारण त्या काळी अशी प्रणयाने उत्कट भरलेले गाणे गाणं फ़ारसे चांगले मानले जात नसे!
त्यावर सुरेश भट म्हणाले,"बरं मग या कवितेचा खरा अर्थ तुम्हाला सांगावा लागेल. ही कविता फ़ार फ़ार दुख्खी आहे. कारण मी ही कविता माझ्या ऐन तारुण्यात विधवा झालेल्या वहिनीसाठी लिहिली आहे! माझा मित्र यु्द्धात मारला गेला, त्याचे नुकतेच लग्न झाले होते. वहिनीच्या हातावरची मेहंदी सुद्धा फ़िक्कट झाली नसेल आणि तिचे कुंकु पुसलं गेलं!"
अर्थातच हे ऐकुन आशाताई लगेच गायला तयार झाल्या...
मी हे वाचलं आणि नकळत डोळ्यात पाणी तराळलं! पुन्हा एकदा हि कविता नीट वाचली आणि खरा अर्थ कळला. मनाला भिडला! खरच..किती great होते नाही सुरेश भट ?..
Few Links -
Original Song Sung by Ashaji - Here
Sung by Anuradha Marathe in Nakshatranche Dene - Video
My favourite version Sung by Savani Ravindra - Here